उन्हाळा चालू झाला, गरम होऊ लागलं कि आपल्या मनात विचार आल्याशिवाय राहत नाही कि किती हे तापमान !सूर्यापासून एवढे दूर असूनही किती हि गरमी . मग विचार करा कि सूर्याच्या अजून जवळ गेलं तर काय होईल ? आणि मी जर तुम्हाला सांगितलं कि सूर्यापेक्षा हजारो पटीने जास्त तापमान असणारे तारेही या जगात आहेत तर !
होय, आपला सूर्य म्हणजे या विश्वामधला अगदी साधारण तारा, जशी आपण साधी माणसं. सूर्यापेक्षा आकारानं खूप जास्त मोठे आणि पृष्ठभागाचे तापमान हजारो पटीने जास्त असणारे तारे सुद्धा या जगात आहेत. असे सरासरी २००,०००,०००,०००,०००,०००,०००,००० तारे या विश्वामध्ये आहेत असं साधारणपणे मानलं जातं. मग आता यांचा अभ्यास करायचा म्हणाल तर यांना सगळ्यांना लक्षात ठेवण्यासाठी सोपी पद्धत हवी. यासाठीच या ताऱ्यांचे वर्गीकरण करण्यात आलं आहे. ओ , बी, ए, एफ, जी, के अश्या वर्गांमध्ये.
खूप कमी लोकांना माहित असतं कि भारतीय खगोलशास्त्रज्ञांनी कोणते शोध लावले किंवा या क्षेत्रामध्ये यांची काय भागीदारी आहे. मेघनाद शहा यांनीच सुरवातीला सूर्यप्रकाशाचा अभ्यास करून १९२० साली आपला सूर्य हैड्रोजन, हेलिअम, आणि कार्बन यांचा बनलेला आहे हे सांगितलं.
![]() |
| रात्री आकाशात दिसणारे सर्वात तेजस्वी २५ तारे. credit- Tregoovhitr Jittasaiyaoan |
"ओ प्रकारचे तारे "
हे तारे सर्व प्रकारच्या तार्यांमध्ये सर्वात जास्त वस्तुमान असणारे या त्याचबरोबर सर्वात जास्त पृष्ठभागाचे तापमान (२५,००० ते ४०,००० डिग्री केल्विन ,० डिग्री सेल्सिअस = २७३ डिग्री केल्विन) असणारे असतात. त्यांच्या खूप जास्त तापमानामुळे हे निळ्या रंगात चमकतात आणि म्हणूनच यांना नीलतारे असे संबोधले जाते. या ताऱ्यांचे वस्तुमान जवळजवळ १६ सौरवस्तुमाना एवढे असते ( एक सौरवस्तुमान म्हणजे आपल्या सूर्याचे वस्तुमान). या ताऱ्यांची त्रिज्या ७ सौरत्रिज्ये एवढी असते आणि यांची प्रकाशमानता हि ३०,००० सौरप्रकाशमानते एवढी असते. म्हणजे हे सूर्यापेक्षा ३०,००० पट प्रकाशमान असतात. विश्वामध्ये यांचे प्रमाण खूप कमी असून ते फक्त ०. ००००३ % इतकेच आहे.
"बी-प्रकारचे तारे "
या प्रकारच्या ताऱ्यांचे पृष्ठतापमान हे १०,००० केल्विन ते २५,००० केल्विन पर्यंत असू शकते. यांना नीलतारे किंवा श्वेततारे असं संबोधलं जातं . या ताऱ्यांचे वस्तुमान २ सौरवस्तुमानापासून ते १६ सौरवस्तुमानाइतके असू शकते. त्रिज्या १.८ ते ६.६ सौरत्रिज्येपर्यंत असू शकते. या प्रकारचे तारे सूर्यापेक्षा २५ ते ३०,००० पट प्रकाशमान असतात. विश्वामध्ये यांचे प्रमाण १% इअटके आहे.
"ए प्रकारचे तारे "
हे तारे १.४ ते २ सौरवस्तुमानाचे असतात. यांच्या पृष्ठभागाचे तापमान ७,५०० ते १०,००० केल्विन इतके असून यांना श्वेततारे म्हणतात. अश्या तारकांची त्रिज्या सूर्याच्या १.४ ते १.८ पट असून हे तारे सूर्यापेक्षा पाच ते पंचवीसपट प्रकाशमान असतात.
"एफ प्रकारचे तारे"
हे तारे पिवळ्या किंवा पांढऱ्या रंगामध्ये चमकतात. यांचे वस्तुमान १.०४ ते १.४० सौरवस्तुमानाइतके असते तर त्रिज्या १.१५ ते १.५० सौरत्रिज्येएवढी असते. पृष्ठभागाचे तापमान ६,००० ते ७,५०० केल्विन इतके असते आणि हे तारे सूर्यापेक्षा १.५ ते ५ पट प्रकाशमान असतात.
"जी प्रकारचे तारे"
हे तारे शक्यतो फक्त पिवळ्या रंगाचे असतात. आपला सूर्य हा याच प्रकारातला. यांच्या पृष्ठभागाचे तापमान ५,२०० ते ६,००० केल्विन असते. त्याचबरोबर वस्तुमान ०.८ ते १.०४ सौरवस्तुमानाइतके असते. प्रकाशमानता सूर्याच्या ०.९८ ते १.१५ इतक्या प्रमाणात असते. यांना मुख्य क्रमाचे तारे असेही म्हंटले जाते. विश्वामध्ये यांची संख्या ३% आहे.
"के प्रकारचे तारे"
या प्रकारच्या तार्यांची संख्या विश्वामध्ये १२% आहे. हे तारे केसरी रंगाचे असतात. याच्या पृष्ठभागाचे तापमान ३,७०० ते ५,२०० केल्विन असते. वस्तुमान ०.४ ते ०.८ सौरवस्तुमानाइतके असते तर त्रिज्या ०.७ ते ०.९६ सौरत्रिज्येइतकी असते. यांची प्रकाशमनात खूप कमी असते, क्षीण असते. ती सूर्याच्या फक्त ०.०८ ते ०.६ पट इतकीच असते.
"एम प्रकारचे तारे"
यांची संख्या विश्वामध्ये सर्वात जास्त आहे आणि ती ७६% आहे. यांचा रंग लाल असतो. पृथाभागाचे तापमान २,४०० ते ३,७०० केल्विन इतके असते. वस्तुमान ०.०८ ते ०.४५ सौरवस्तुमानाइतके असते. त्रिज्या सूर्यापेक्षा कमी म्हणजे ०.७ किंवा त्याहींनाही कमी असते. हे सर्वात क्षीण प्रकाशमनात असलेले तारे असतात. सूर्यापेक्षा हे तारे ०.०८ किंवा त्याहूनही कमी प्रकाशमान असू शकतात.
![]() | |
स्पेन देशमधून दिसणारे रात्रीचे आकाश.
|
याव्यतिरिक्त त्यांच्यासोबत असणारे इतर तारे किंवा कृष्णविवरं किंवा त्यांच्यामध्ये होणाऱ्या अणुकेंद्रकीय प्रक्रिया यावरूनही त्यांचे इतर प्रकार पडतात तेही आपण पाहणार आहोत.


Comments
Post a Comment